एकाच खात्याचे दोन मंत्री का..? मंत्री बावनकुळेंनी केला खुलासा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “भाजपा नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (ता. 22 डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जलसंपदा विभागाचे दोन विभाग करण्यात आले असून त्याची जबाबदारी दोन नेत्यांकडे देण्यात आली आहे, यामागचे नेमके कारण काय?
असा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला असता, ते याबाबत उत्तर देताना म्हणाले की, ज्यावेळी युतीचे सरकार असते, तेव्हा जे खातेवाटप होते. त्यामध्ये शिवसेनेला खाते गेले, राष्ट्रवादीला खाते आले. पण आमच्याकडे 16 मंत्री आहेत आणि आमच्याकडे जे खाते आले त्यानुसार आम्ही त्यांचे विभाजन केले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच न्याय मिळावा, या हिशोबाने त्याबाबतचा निर्णय घेतला. एकाच खात्याकडे दोन मंत्री असल्याने तो विभाग आणखी चांगल्या पद्धतीने पुढे जातो, असे यावेळी बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
तसेच, जलसंपदा विभागामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि त्याचा खालचा पट्टा म्हणजेच मुंबईचा भाग या असे दोन भाग केले आहेत. यामुळे खात्याचे सुलभीकरण तर होईल. पण खाते कमी असल्याने आणि मंत्री जास्त असल्याने त्याचे अशा पद्धतीने वाटप करण्यात आले आहे. तीन पक्षाचे सरकार असल्याने यामध्ये कमी जास्त सुद्धा करावे लागले. म्हणून सरकारमध्ये काही खात्यांचे विभाजन झाल्याचे पाहायला मिळत आहे, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आला आहे. फडणवीसांच्या सरकारमध्ये जलसंपदा खात्याचे दोन विभाग करण्यात आले आहे. यामध्ये जलसंपदा खात्यातील गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ हे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, विदर्भ, तापी कोकण हा जलसंपदामधील दुसरा विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे.
यावेळी मंत्री बावनकुळे यांनी पालकमंत्री पदाबाबतही मोठे विधान केले. त्यांनी याबाबत माहिती देत म्हटले की, 12 जिल्ह्यात मंत्री नाही कारण तीन पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे कमी जास्त होणारच. पण ज्या पद्धतीने खातेवाटप योग्य पद्धतीने पार पाडले. त्या पद्धतीने पालकमंत्री पद हे देऊ करू. महायुतीत सर्वजण समजदार आहेत. यासाठीचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य काही नेते एकत्रित बसून चर्चा करतील. त्यामुळे याबाबतचा कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेऊ, असे मंत्री बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….