स्व.मोहनाललजी पुरोहित महाविद्यालयातील निकालाचा आदर्श कायम ; विज्ञान शाखेचा ९६.११ टक्के तर कला शाखेचा ९४.८७ टक्के निकाल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी ते मार्चदरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला झाला .महागाव तालुक्याच्या निकाल आज स्पर्धात्मक दृष्ट्या समाधानकारक असून त्यात स्व. मोहनालालजी पुरोहित महाविद्यालयाच्या निकालात मागील वर्षाच्या निकालात तुलनेत यावर्षी निकालात भरारी आली आहे.
महाविद्यालयातून विज्ञान शाखेत प्रथम सानिका संतोष नरवाडे (८३.६९ टक्के), द्वितीय नेहा दत्ता कदम (८३.२३ टक्के) ,तृतीय कृष्णा अंगद फाजगे (८१.६९टक्के), तर चतुर्थ आदित्य संतोष काकडे (८१.०७ टक्के) आला आहे. कला शाखेतून प्रथम विकास मुरलीधर राठोड, द्वितीय संध्या बालाजी राऊत तर संजय मोहन रुमाले यांनी तृतीय येण्याचा बहुमान मिळविला .
स्व. मोहनालालजी पुरोहित महाविद्यालयातील विज्ञान आणि कला शाखेच्या सरासरी निकाल ९६ टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेतील प्रथम श्रेणीत ४३ ,द्वितीय श्रेणीत ४२,तर कला शाखेतील प्रथम श्रेणीत ६,द्वितीय श्रेणीत २६ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करित घवघवित यश संपादन केले केले आहे .त्यांच्या या यशाने महाविद्यालयांचे संस्थापक तथा अध्यक्ष रितेश पुरोहित,व्यवस्थापक भरोस चव्हाण ,प्राचार्य ए. टी. मूनेश्र्वर,प्राध्यापक डी.एल. संगेवार, ओ.आर.भुसारे,एम.एस.गोरे,एस.बी.शिंदे,आर.बी.खान,लिपिक रामराव राठोड, यज्ञेश राठोड,शंकर दलसिंगारे, यांनी त्यांचे कौतुक केले आहे.