राज्यावर दुहेरी संकट! हु़डहुडी वाढत असताना पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता, IMD चा अंदाज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *राज्यात थंडीचा जोर हळुहळु वाढत असून काही भागातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. हुडहुडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी जाणवत आहे.
त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात यंदाचे आतापर्यंतचे निच्चांकी तापमान नोंदविले गेले आहे. अशात आता राज्यावर अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 23 नोव्हेंबरपासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होत अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाली आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. हे वारे राज्याच्या दशेने मार्गक्रम करीत आहे. त्यामुळे राज्यात थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे.
अवकाळी पावसाचे संकट
राज्यात यंदा परतीचा पाऊस चांगलाच लांबला होता. परतीचा पाऊस लांबल्याने यंदा थंडीची चाहूल देखील उशीरा लागली. राज्यात आता कुठं थंडीचा जोर वाढत असताना आता पुन्हा अवकाळी पावसाचे संकट राज्यावर येवून ठेपले आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्याता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात झाल्याने थंडीचा जोर कमी होण्याची शक्तता आहे. त्यानुसार, राज्यात अवघे दोनच दिवस म्हणजे 22 नोव्हेंबरपर्यंत थंडी राहील, त्यानंतर अवकाळी पावसाचे संकट राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 23 ते 25 नोव्हेंबरपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर 26 नोव्हेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नाशिक, पुणे गारठले
राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. असे असले तरी राज्यातील काही भागांमध्ये गुलाबी थंडीची प्रतिक्षा कायम आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा कमालिचा घसरला आहे. यात उत्तर महाराष्ट्र आणि पुण्याचा अवर्जुन उल्लेख केला पाहिजे. हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच उत्तर महराष्ट्रत गारठा जाणवत असून या ठिकाणी आतापर्यंतचे सर्वात निचांकी तापमाण नोंदविले गेले. तर बुधवारी पुणे शहराचे किमान तापमान 12.2 इतके नोंदविले गेले.