भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली..? अजित पवारांनी मांडली भूमिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपाचा विरोध असूनही अजित पवारांनी अखेरच्या दिवशी पत्ते खोलत नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर केली. यावरून महायुतीत वाद होण्याची चिन्हे असताना अजित पवारांनीनवाब मलिकांना उमेदवारी देण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.
मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. मनी लाँड्रिंग, दाऊदशी संबंध असे गंभीर आरोप केले होते. यामुळे मलिक यांना सोबत घेण्यास भाजपाचा विरोध होता. मलिक यांना उमेदवारी देण्यास अजित पवारांना भाजपाने विरोध केला होता. तरीही २९ ऑक्टोबरला अखेरच्या क्षणाला अजित पवारांनी मलिक यांना एबी फॉर्म दिला आणि मलिकांनी उमेदवारी दाखल केली आहे.
अजित पवार यांनी यावर खुलासा केला आहे. नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, सिद्ध झालेले नाहीत. माझ्यावरही अनेक आरोप झाले. एखादा पुढे जात असेल, शक्तीस्थळावर आघात करण्यासाठी आरोप केले जातात. राजीव गांधी यांची मिस्टर क्लीन अशी इमेज होती. ती डॅमेज केल्याशिवाय त्यांची ताकद कमी करता येणार नाही. बोफोर्सचे आरोप झाले आणि इंदिरा गांधींपेक्षा जास्त जागा निवडून आणलेल्या नेत्याला फटका बसला. यामुळे आरोप असणे वेगळे, एखादा आरोप सिद्ध होणे वेगळे. मलिक यांच्यावर आरोप झालेला आहे, त्यात तथ्य नसल्याचे आमचे म्हणणे आहे, असे अजित पवार म्हणाले.
कमी जागा का घेतल्या…
५५ जागा वाटपावर अजित पवार यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. उमेदवारी अर्ज मागे घेणार तेव्हा तुम्हाला समजेल. अधाशासारख्या जास्त जागा घेऊन शून्य निवडून आणायच्या नाहीत. आवाक्यात जागा घेऊन त्या निवडून आणण्यासाठी प्रयत्न आहेत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….