विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून पाचवी यादी जाहीर, अखेरच्या क्षणी माढ्यासह या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाख करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधून शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.
या यादीमध्ये अनेक इच्छुकांच्या दावेदारीमुळे तिढा निर्माण झालेल्या माढ्याच्या जागेवर अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आज माढा, मुलुंड, मोर्शी, मोहोळ आणि पंढरपूर या एकूण पाच मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या माढ्यामध्ये शरद पवार गटाने अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शीमध्ये गिरीश कराळे आणि पंढपूरमधून अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तसेच उमेदवारीवरून वाद झालेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारही शरद पवार गटाने बदलला आहे. मोहोळमध्ये सिद्धी कदम यांना दिलेली उमेदवारी रद्द करत शरद पवार गटाने राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….