उमरखेडच्या जुगार अड्डयावर छापा एसडीपीओं पथकाची कामगीरी ; ३९ जुगाऱ्यांना अटक ; ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड
शहरातील सदानंद वार्डात राहणाऱ्या एका घरी जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनिय माहीती वरून उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या पथकाने गुरवारी(२५ जून) रात्री ८ : ३० वाजताचे छापा टाकुन ३९ प्रतिष्ठीत जुगाऱ्यांना अटक केली व त्यांच्या कडून,रोख, ९लाख ३८ हजार ९७० एवढ्या रकमेसह वाहनांसह एकूण ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . एवढ्या मोठ्या कार्यवाही मुळे तालुक्यातील जुगाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .
स्थानिक सदानंद वार्डात नितीन बंग यांचे राहते घरी शाही थाटात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराज जैन यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पथक पाठवून तालुक्यातील सर्वात मोठया जुगार अड्डयावर धाड मारून आरोपी नितीन बंग, विनोद कदम गोकुळ नगर , सुधीर देशमुख पाटील नगर , माधव कगेवाड सोईट ( म,) , शे . अहमद शे . मिरांजी ढाणकी , प्रकाश नंदनवार खडक पूरा , प्रेमचंद कोठारी ढाणकी , विलास पाईकराव हदगाव , आवेश खान अहमद खान आझाद वार्ड उमरखेड , साहेबराव माने यादव नगर , गुणवंत काळे हदगांव , सुनिल पवार यादव नगर , अरुण भानावत भगतसिंग वार्ड , कोंडबा खंदारे खडकपूरा, बापूराव वानखेडे ल्याहारी ता . हदगांव , कैलास मालू हदगांव, सतिष भगत कारखाना कॉलनी , संजय गोडबोले हदगांव , अमित अडसुळ नगरसेवक हदगांव , शे . तहसिन शे . सलीम आझाद वार्ड , अरविंद खानजोडे भगतसिंग वार्ड , सै . सिकंदर रहिम नगर , ज्ञानेश्वर कांबळे ढाणकी , भुसार व्यापारी लक्ष्मीकांत मुक्कावार ब्राम्हणगांव , नारायण गंगरपाड ढाणकी , करण रुडे सिद्धेश्वर वार्ड , विजय मामीडवार हदगांव, साहेबराव देवकर हदगांव , रवि कबले विवेकानंद वार्ड , साहेबराव पायघन हरदडा , सचिन कलाणे राजापूर वाडी , राजू कवाणे सदानंद वार्ड , फिरोज खान आझाद खान जाकीर हुसेन वार्ड , विपूल शिंदे मार्लेगाव , सचिन बंग सदानंद वार्ड , संतोष जाधव सदानंद वार्ड , परमानंद बाहेती म .गांधी वार्ड , व देवानंद पावडे सदानंद वार्ड, भास्कर चौधरी टिळक वार्ड असे एकुण ३९ जणांना ताब्यात घेतले व त्यांचे विरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ , ५ , सह साथरोग प्रतिबंधक कलम १८८ , २७९ , २७१ ( ३४ ) भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्याकडून नगदी रोख ९ लाख ३८ हजार ९७० रुपये, ४ लाख २९ हजार रुपये किंमतीचे एकुण ६५ मोबाईल , ४ मोटारसायकल किंमत २ लाख २० हजार रुपये , तीन चारचाकी वाहने किंमत ३० लाख , जुगार खेळण्यासाठी वापरलेले साहित्य १ लाख ४७ हजार असा एकुण ४७ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पथकाचे पो . उपनिरीक्षक महेश घुगे , रेवण जागृत , उदयराज शुकला , प्रकाश चव्हाण , छगन चंदन , मोहन चाटे , वसीम शेख , यूनुस भातनासे, भावना पहुरकर, अंबादास गवारे , नवनाथ कल्याणकर ,दिपक तगरे , विशाल जाधव , विठ्ठल भंडारे आदिंनी ही कार्यवाही केली .
सदर घटनेतील आरोपी मध्ये हदगांवचे माजी खासदार यांचे पुतणे बापूराव वानखेडे , हदगाव चे माजी नगराध्यक्ष नगर परिषदेचे गटनेते आमित अडसुळ ,यांच्यासह ४ शिक्षक , नगरसेवक , सेवा निवृृृत्त कर्मचारी , व्यापारी आदींचा समावेश आहे त्यामुळे राजकिय वर्तुळा सह सर्वत्र खळबळ माजविली आहे .