आता कळलं असेल मराठा आरक्षण का आणि किती महत्वाचं होतं!”: छत्रपती संभाजी राजे

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेत मराठा समाजातील १२७ तरुण अधिकारी झाले आहेत. समाज माध्यमांमधून या विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाची थाप पडत आहे.
युवराज संभाजी राजेंनी फेसबुक वर पोस्ट टाकून सांगितले की ” आता सर्वाना कळले असेल की मराठा आरक्षण का आणि किती महत्वाचे आहे, मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एमपीएससीच्या पदभरतीमध्ये मराठा समाजातील उमेदवारासाठी जागा राखून ठेवल्या गेल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गात नोकरीत १३ टक्के आरक्षण लागू केले.महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १३ ते १५ जुलै २०१९ या दरम्यान मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या परीक्षा केंद्रावर ४२० पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा घेतली होती.
*अधिकारी झालेल्यांची संख्या*:
8 . डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर महाराष्ट्र सर्व्हिस -12
15) Assistant Project Officer / State Officer/ Administration Officer / Registrar -1
16) NAIB Tahsildar – 33
“मराठा आरक्षणामुळे जवळपास १२७ तरुण विद्यार्थी अधिकारी झाले. हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश 50 पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच आहे. यावरच आपली लढाई थांबलेली नाही, अनेक जण उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, शिक्षणाधिकारी झाले. सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारची आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी आहे .आज हे अधिकारी बघितल्यानंतरमराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद अधिक आहे’, असं विनोद पाटील यांनी सांगितले .

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”