महात्मा बसवेश्वर जयंती निमित्य भव्य शोभायात्रेचे आयोजन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- वीरशैव लिंगायत समाज व जगद्व्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती २०२४ यांचे द्वारा महात्मा बसवेश्वर महाराज यांचा ९१९ वा जयंती उत्सव दि १० मे २०२४ ला मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
महात्मा बसवेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात फार मोठी क्रांती घडवून आणली त्यांनी लोकशाही संसद म्हणजे ‘ अनुभव मंटपाची स्थापना केली या अनुभव मंडपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. महात्मा बसवेश्वरानी समाजातील रूढी परंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टीची अमंलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणुन महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी १२ व्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून केली अशा ह्या महामानवाच्या विचाराची ओळख समाजाला व्हावी या उद्देशान सर्व समाज बाधंव व महिला भगीनी सह भव्य मोटर सायकल रॅली, भव्य शोभायात्रा ईत्यादी कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.
१० मे रोजी सकाळी ८ वाजता लिंगायत मठ व मारोती मंदीर देवी वार्ड येथुन भव्य मोटार सायकल रॅली काढली जाणार आहे ह्यामध्ये समाजातील महिला, पुरुष पारंपारिक पोशाख परिधान करून उपस्थित राहणार आहे हि रॅली देवीवार्ड येथुन निघून नेताजी सुभाषचंद्र चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वतंत्र सेनानी बाबासाहेब मुखरे चौक, वसंतराव नाईक चौक, महात्मा फुले चौक, श्रीरामपुर येथील महात्मा बसवेश्वर यांचे फलकास हार अर्पण करून परत बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, छत्रपती वीर संभाजी महाराज चौकातून देवी वार्ड येथील मठामध्ये येईल त्यानंतर १० वाजता महात्मा बसवेश्वर महाराज यांचे अर्धाकृती पुतळ्याचे विधिवत पूजन व सामुहिक आरती होईल संध्याकाळी ५ वाजता शोभायात्रे सुरुवात होईल यामध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची पालखी, म बसवेश्वर यांची झाकी घोड्यावर विराजमान, मुख्य आकर्षण शंकर, पार्वती, नंदी, कार्तिक, गणपती भव्य स्थामध्ये विराजमान, भजनी मंडळ, ट्रॅक्टर मध्ये भगवान शिवाची, महात्मा बसवेश्वरांची, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची मुर्ती विराजमान राहील तसेच प्रभू श्रीराम, सितामाता, लक्ष्मण, हनुमानजी यांची सुंदर झाकी राहील. अचलपुर येथील प्रसिद्ध बॅन्ड पथक, बंजारा कलावंतांची डफडी ईत्यादी राहणार आहे. शहराच्या विविध चौकातून मार्गक्रम करत परत लिंगायत मठामध्ये येईल. रात्री ९ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. महाप्रसाद श्री व सौ संध्या सुशील रोहडकर यांचे कडुन आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष संतोष तडकसे पुसद यांनी केले आहे असे सचिव प्रशांत शिवणकर यांनी कळविले.