महायुतीचा जागावाटपाचा फार्मूला निश्चित….?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला गुरुवारी निश्चित झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप लोकसभेच्या 48 पैकी 27 जागा लढवणार आहे.
शिवसेनेच्या वाट्याला 14, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 5 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित दोन जागांबाबत महायुतीत अद्याप पेच कायम आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय झालेला नाही. दरम्यान, महायुतीच्या बैठकीनंतर शिवसेनेने 14 पैकी 8 उमेदवारांची यादी सायंकाळी जाहीर केली.
महायुतीच्या यापूर्वी झालेल्या बैठकीत भाजपने 30 ते 32 जागांवर दावा केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात झाली होती. भाजपने शिवसेनेला 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीला 6 ते 8 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, गुरुवारी झालेल्या बैठकीत भाजपने एक पाऊल मागे घेत 32 ऐवजी 27 जागांवर निवडणूक लढविण्यास संमती दिली.
या बैठकीनंतर काही वेळातच शिवसेनेने आपल्या 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. विशेष म्हणजे, या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा समावेश नाही.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचीही जागावाटप निश्चित करण्यासाठी बैठक झाली. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 उमेदवार जाहीर केले होते. यातील 3 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
चांदी १० हजारांनी स्वस्त, सोन्याच्या किमतीतही घसरण; पाहा दिल्ली, मुंबईसह अन्य शहरांतील दर….
देशात आर्थिक मंदीचा धोका..? शरद पवारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न; मोदींना दिली ‘ही’ महत्त्वाची सूचना….