एका भाजी विक्रेती महिलेमुळे अख्खे गाव झाले सील

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शिर्डी:-
आपली एक चूक इतरांना किती महागात पडू शकते, याचा कोणीच विचार करताना दिसत नाही. घरात राहा सुरक्षित राहा हे सांगून सांगून त्याचा पार भुगा पडला आहे. तरीही कोणीही ऐकायला तयार नाही. स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी तरी घरात बसा ही मानसिकताच उरलेली नाही. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असूनही लोकं घराबाहेर पडत आहेत. सोशल डिस्टंसिंगचा फार फज्जा उडत आहेत. अशात संक्रमण आटोक्यात आणणे तर सोडाच त्याचे संक्रमण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात स्थलांतरामुळेदेखील कोरोनाच्या भीतीने गावकऱ्याना धडकी भरवली आहे. अशात गेल्या कित्येक दिवसांपासून पुणे, मुंबईतून गावाकडे येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
शिर्डी शेजारच्या निमगाव येथील भाजी विक्रेती महिला कोरोनाबाधित झाल्याने आख्ख गाव आता पुढील चौदा दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह 29 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णाचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आता, अहवाल नेमका काय येतो, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”