अशोक चव्हाणांसोबत १० ते ११ काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
त्याचप्रमाणे त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला. ”आज सोमवारी (दि. १२ फेब्रुवारी) मी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” अशी माहिती स्वतः अशोक चव्हाण यांनी X वर पोस्ट दिली.
दरम्यान, अशोक चव्हाण भाजपकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरू शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे किती आमदार जातील याचा अंदाज खुद्द काँग्रेसला नाही. पण मागच्या राज्यसभा निवडणुकीत म्हणजे शिंदे बंडाच्या आधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत गैरहजर राहिलेले १० ते ११ काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाऊ शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे.
‘या’ आमदारांच्या फुटण्याची चर्चा
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, धीरज देशमुख, प्रणिती शिंदे, जितेश अंतरपूर, झिशान सिद्दीकी, राजू आवळे, मोहन हंबरडे, कुणाल पाटील, माधवराव जवळगावकर आणि शिरीष चौधरी ही नावे चर्चेत आहेत.