दिलासा : हुडीतील कोरोना पॉझीटीव्ह च्या संपर्कातील कॉरंटाइन केलेल्या “त्या” १६ जणांना डिस्चार्ज
तर एक “तो” पॉझिटिव्ह रुग्णही ही लवकर बरा होणार!
रियाज पारेख :९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
पुसद तालुक्यातील हूडी निंबी व महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे कोरोना चे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुसद व महागाव तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुसद येथील हुडी रुग्णाच्या संपर्कात आलेला माळकिन्ही येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला त्याला यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या सहा जणांना होम कॉरंटाइन करण्यात आले होते आणि या सहाचे प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या त्या एकूण दहा जणांना सुद्धा कोरण टाईन करण्यात आले होते.आता हे एकूणच सर्वांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून ते १६ ही जण निगेटिव्ह आले असल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या १६ जणांना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी महागाव आरोग्य प्रशासनाला डिस्चार्ज देण्याचे आदेशित केले होते.त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जब्बार पठाण यांनी आज त्यांना त्यांच्या घरी पाठवले आहे.
यावेळी तहसीलदार निलेश मडके,वैद्यकीय अधिकारी डॉ.बिपिन बाभले, उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर,यांच्या उपस्थितीत रुग्णवाहकेतून गावी पाठविण्यात आले आहे.
डिस्चार्ज देताना तालुका आरोग्य अधिकारी मार्गदर्शन करताना
ही तर आमच्यासाठी रंगीत तालीम : टीएचओ
प्रथमच तालुक्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आलेल्या सोळा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे आम्ही केलेले उपचार त्यापासून आम्ही बरेच काही शिकलो व यांना निगेटिव्ह करता आले तसेच माळकिन्ही येथील पॉझिटिव्ह रुग्ण लवकर बरा होईल असा विश्वास आहे. व तालुका कोरोना मुक्त होईल या लढ्यात जिल्हा शल्यचिकित्सक सह तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी इतर प्रशासन सज्ज आहे.
डॉक्टर जब्बार पठाण
तालुका आरोग्य अधिकारी महागाव