अशोक चव्हांणां विषयी अक्षेपार्ह लिखान करणार्या ईसमावर अखेर गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरेाना संसर्गाचा मुकाबला करणार्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर लिहणार्या युवकाविरुद्ध नायगाव तालुक्यातील रामतीर्थ पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा करण्यात आला आहे. अत्यंत निदंनिय मजकुर लिहण्यावरून काँग्रेस कार्यकर्ते संतापले होते.
अशोक चव्हाण यांना कोरोनाचा लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ते या आजारातून लवकर बरे व्हावेत,यासाठी जिल्हाभरातून त्यांचे समर्थक व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व पक्षामधील नेतेमंडळी प्रार्थना करत असताना सिडको भागात राहणार्या गोविंद पाटील कदम शिरशिकर यांनी जैसे ज्याचे कर्म तैसा फळ देतो ईश्वर, बातमी खरी आहे,की खोटी माहित नाही,असेल तर खूप छान वाचला नाही पाहिजे, अशी पोष्ट फेसबुकवर केली होती.
या प्रकरणी गोविंद पाटील कदम शिरशिकर याच्या विरोधात नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार सुधाकर भिलवंडे,नजीर बागवान,नजीर फरिद्साब शेख,फारुख महबूब बेग पटेल यांनी दिली होती. यावरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात दिली होती. यावरून सोमवारी सांयकाळी गोविंद शिरशिकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही पोष्ट बघितल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्ते व अशोक चव्हाण यांचे समर्थक तरुणांनी गोविंद पाटील कदम शिरशिकर यास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत खडा समाचार घेत माफी मागण्यास भाग पाडले.