नरेंद्र पाटील यांची २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अयोध्येतील निर्माणाधिन असलेले प्रभु श्री रामांच्या मंदिराचे उद्घाटन जवळ येत आहे तसे ठिकठिकाणाहून २२ जानेवारी रोजी सर्वत्र उत्सवाचे वातावरण असणार आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्रात तथा भारतात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी जनप्रतिनिधींकडून होताना पुढे येत आहे.
नुकतेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ आणि माजी विधानपरिषद सदस्य मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याकडूनही दि. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रात राम मंदिर उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
“तब्बल ५०० वर्षांच्या संघर्षानंतर प्रभु श्री रामांचे भव्य मंदिर अयोध्या नगरीत साकार होत असून दि. २२ जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहन भागवत जी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल. त्या निमित्ताने देशभरातील सर्व रामभक्त आणि देशातील नागरिक हे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा दिवस साजरा करणार आहेत. महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक ठिकाणी धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरण असणार आहे.
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी यापूर्वीही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे, भाजप आमदार मा. अतुल भातखलकर, इ. विनाधसभा व विधानपरिषद सदस्यांनी केलेली आहे. तरी आपण दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, ही नम्र विनंती”
— नरेंद्र अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ, मंत्रिपद दर्जा…