…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल :चंद्रकांत पाटील
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार आता सक्रिय झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी रात्री कोल्हापूरात बोलताना वर्तवले. हे नको असेल तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून महाराष्ट्रातील स्थितीमध्ये पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची विनंती करावी, असेही त्यांनी सुचवले.
कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध निर्णय घेण्यात येत आहे.मात्र, तरीदेखील कोरोनाला रोखण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर पडत नाही अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे शरद पवार सक्रिय झाले आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल, असे भाकितच पाटील यांनी वर्तवले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी याअगोदर एका मुलाखतीतही उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. भाजपा वारंवार राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळत नसल्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटतो असं पाटील यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. मग त्यांना कोरोना रोखण्याबाबत सल्ले कसे देणार असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळवून द्या, आम्ही त्यांना भेटायला तयार आहोत, असंही पाटील म्हणाले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पाटील यांनी कोल्हापुरातून टीका केली आहे.
दरम्यान, कोरोना संकटाचे कोल्हापूरच्या प्रशासनास गांभीर्य कळले नसून पालकमंत्री सतेज पाटील यांचा हम करे सो कायदा असा कारभार सुरू आहे. कॅबिनेटमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना ते विश्वासात घेत नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”