मृतकाच्या अन्न नलिकेत कार्बन चे कनामूळे आरोपींची निर्दोष सुटका ; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल ; खुन की आत्महत्या असा निर्माण झाला होता संभ्रम…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मृतकाच्या अन्न नलिकेत कार्बन चे कनामूळे खुनाच्या प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता करणारा निकाल पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मखरे मॅडम यांनी महत्वपुर्ण निर्णय दिला. त्यात त्यांनी आरोपी जयवंत मेटकर, शिवाजी अवधूत मेटकर, कुसुमबाई शिवाजी मेटकर व रेणुका राजु शिंदे यांची अपर्णा जयंवत मेटकर हिच्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष
मुक्तता केली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, महागाव तालुक्यातील गुंज येथील रहिवासी जयवंत शिवाजी मेटकर याचे लग्न सन २००९ मध्ये किनवट तालुक्यातील लोणी गावचे फिर्यादी शिवाजी पवार यांची मुलगी अपर्णा हिचेबरोबर झाले होते. लग्नानंतर अपर्णा ही गुंज येथे शिवाजी मेटकर ची पत्नी म्हणून संसार करावयास आली आणि त्यानंतर दिनांक २३.०३. २०१० रोजी अंदाजे ५.०० वाजंताचे सुमारास गावातील लोकांना जयवंत मेटकर यांचे घराला आग लागली, असे निदर्शनास आले, त्यात आरोपी जयवंत ची पत्नी ९८ टक्के भाजली असल्याने, तिला प्रथम सवना व नंतर यवतमाळ शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिला तपासाअंती डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्यानंतर मृत अपर्णा चे वडिल फिर्यादी शिवाजी पवार यांनी हुंडयाच्या पैशाकरिता शारिरिक व मानसिक छळ करून, आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत महागांव पोलीस स्टेशन येथे दिलैल्या तक्रारीवरून आरोपी पती जयवंत, सासू, सासरे व नणंद यांचे विरूध्द कलम ३०६, ४९८ (अ) सह ३४ भा.दं.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
तपासादरम्यान तपासी अधिकारी यांना मृत अपर्णा हिचे गळयाभोवती पदर गुंडाळलेल्या अवस्थेत आढळल्याने तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार सदर प्रकरण हे आत्महत्येचे नसून, खुनाचे असल्याने आरोपी जयवंत व ईतर यांचे विरूध्द वाढीव कलम ३०२ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे वि.न्यायालयात
१२ साक्षदार तपासून, मृत अपर्णा हिचा खुन करून, आत्महत्या दर्शविण्यासाठी तिला जाळून टाकल्याचा युक्तिवाद केला व आरोपीने खुनाच्या आरोपाखाली शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केला.
आरोपीचे वतीने आरोपीचे वकील ॲड आदित्य माने यांनी सदरचे प्रकरण हे खुनाचे नसून, आत्महत्येचे असल्याबाबत युक्तिवाद केला. तसेच शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मृत अपर्णा हिच्या अन्न नलिकेत कार्बन चे कण सापडले असून, कार्बन चे कण सापडल्यामुळे ज्यावेळी ती जळत होती त्यावेळी ती श्वासोश्वास घेत होती व ती जिवंत होती. तीचा मृत्यु हा जळाल्यामुळे झाल्याचा निष्कर्ष काढण्यात यावा, असा युक्तिवाद केला. तसेच सरकारी पक्ष हा आरोपी ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी तेथे हजर होता, हे सुध्दा सिध्द करू शकले नाहीत. याकरिता आरोपी चे वकील ॲड आदित्य माने यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे दाखले विद्यमान न्यायालयात दाखल केलेत. दोन्हीही पक्षांचा युक्तिवाद ग्राहय धरून पुसद येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती मखरे मॅडम यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….