पोलीस स्टेशन पुसद शहर हददीतील शेलू (बु) येथुन धारधार शस्त्र बागळणा-या इसमास शस्त्रासह ताब्यात घेवून केले जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुध्द प्रभावी कारवाई करणे करीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्त पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 03/12/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपणीय बातीदारा मार्फतीने खबर मिळाली की, पोलीस स्टेशन पुसद शहर हददीतील मौजे शेलू बुद्रुक येथील इसम नामे – रोहीत छत्रगुण सवळे हा सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लोंखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पंचासह घटनास्थळ गाठुन माहिती प्रमाणे रोहीत सवळे याचे घराची घरझडती घेतली असता रोहीत छत्रगुण सवळे रा. शेलु बु. याचे घरझडतीमधुन एक लाकडी मुठ असलेली धारधार तलवार मिळून आल्याने जप्त करुन रोहीत छत्रगुण सवळे वय 20 वर्षे, रा.शेलू बुद्रुक ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पुसद शहर पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात, सपोनि, गजानन गजभारे, पोहवा/तेजाब रंणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा / कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, राजेश जाधव, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.