मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी..! २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एकापाठोपाठ एक मराठा समाजाच्या तरुणांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यात आणखी एका तरुणाची भर पडली असून ‘माझ्या समाजाला आरक्षण मिळावे’ अन् माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी ‘माझा या जगाला राम राम अशी विनंती चिठ्ठीद्वारे करीत कोलठाणवाडी (ता.औरंगाबाद) येथील 24 वर्षे तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.३१) रोजी उघडकीस आली आहे. शुभम अशोक गाडेकर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली असून मराठा समाजाचे तरुण आक्रमक होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात तरुणांनी बलिदान दिले आहे. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या कोलठाणवाडी येथील शुभम गाडेकर याने दुचाकीला झेंडा लावण्यासाठी मोठा भाऊ सचिन गाडेकर यांच्याकडून तीनशे रुपये घेऊन कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर निघाला होता.
दरम्यान त्यांनी सकाळीच गावाच्या परिसरातील एका झाडाला दोरीने गळफास घेतला. त्याची माहिती मिळताच परिसरातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान शुभमच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली त्या चिठ्ठीत माझ्या समाजाला आरक्षण मिळावं..माझ्या जरांगे दादाची काळजी घ्यावी ही विनंती माझा या जगाला राम राम असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बारावी झालेला शुभम हा महापालिकेच्या साफसफाई कर्मचारी असल्याचे त्याचा भाऊ सचिन गाडेकर यांनी सांगितले. शुभमच्या मागे आई-वडील व भाऊ व लग्न झालेली एक बहीण असा परिवार आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या
मराठा समाजाच्या आंदोलनात शुभम गाडेकर हा अग्रेसर होता. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेतही त्यांने हजेरी लावली होती. दरम्यान दोन-तीन दिवसांपासून तो आरक्षणाविषयी सातत्याने बोलत होता आणि अस्वस्थ ही होता. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळेच त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….