मराठा समाजात फूट पाडण्याचं काम सुरू ; राणेंचा पवार-ठाकरेंवर निशाणा, केलं ‘हे’ आवाहन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील वातावरण पेटलं आहे. अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. संतप्त आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ केली आहे. तर महामार्गही पेटवून दिले आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर सरकारकडूनही मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली जात आहे. तशा हालचाली सुरू आहेत. अशातच विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.
नारायण राणेंचं ट्वीट काय?
नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आहे की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मराठा तरुणांनी आत्महत्या करु नयेत. हिंसेच्या मार्गाला जाऊ नये.
नारायण राणे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सर्वांनाच वाटते. अनेक वेळा मुख्यमंत्री पदावर राहूनही आणि अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर राहूनही जे लोक मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत तेच आज महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये फूट पाडत आहेत. राज्याचे वातावरण बिघडवित आहेत. यासंबंधीची दखल तपास यंत्राणा घेतील, असं म्हणत राणे यांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
मराठा समाज आक्रमक
सोमवारी बीडमधील संतप्त मराठा आंदोलकांकडून आरक्षणाच्या मागणीसाठी हिंसक पवित्रा घेतल्याचे दिसून आलं. आधी बीड, धाराशिव नंतर छत्रपती संभाजीनगर आणि आता पुण्यातही मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात देखील अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहे. पिंपरी चिंचवड येथे काही आंदोलकांनी सोमवारी रात्री टायर पेटवत जुन्या मुंबई-पुणे मार्गावर आंदोलन केले होते. तर आज काही आंदोलकांनी सरकारचा निषेध करत मुंडन केले. सोबतच अहमदनगर-सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी अडवला असून, या महामार्गावरही जाळपोळ करण्यात आली.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….