मेहकरमध्ये वीज पडून १ ठार; ५ जखमी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलडाणा :
मेहकर येथील सोनाटी व उमरा येथे वीज पडून एक जण ठार झाला तर पाच जण जखमी झाले आहेत.ही घटना 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.या घटनेत शिवाजी किसन बदर हे जागीच ठार झाले तर त्यांच्या समवेत असलेले अमरदास दौलत कटारे, विष्णू किसन गुंजकर, राम वाघमारे, राजु
शिरे हे चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेहकर येथील एका खासगी रुगणालयात उपचार करण्यात येत आहे.उमरा येथेही बक-या चारण्यास घेवून गेलेल्या रामदास कोंडू शिंदे हा जखमी झाला आहे. त्याच्यावरही मेहकर मध्ये उपचार करण्यात येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात १३ मे रोजी दुपारी अचानक वादळी वा-यासह काही भागात पाऊस झाला. बुलडाणा शहरातही दुपारी सुमारे अर्धातास सोसाट्याच्या वा-यासह वादळी पाऊस झाला. सायंकाळी मेहकर तालुक्यातील सोनाटी गावालगत
शेतात शिवाजी किसन बदर हे काम करत असताना अचानक विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी विज पडल्याने शिवाजी किसन बदर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या समवेत असलेले चार जण जखमी झाले. दरम्यान, वीज पडून मृत्यू पावलेल्या शिवाजी किसन बदर याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…