प्रत्येक टोल नाक्यावर मनसैनिक उभा ठाकणार, नाहीतर टोलनाके जाळणार ; राज ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- टोलच्या पैशांच्या झोलवरून राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडीओ नाद छेडला आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांपासून उद्धव ठाकरे, फडणवीस आणि गोपिनाथ मुंडेंना देखील सोडलेले नाही.
टोलच्या पैशांचं होतं काय? त्याच त्याच कंपन्यांना कंत्राटं कशी मिळतात? असा सवाल केला आहे.
राज ठाकरेंनी आज पुन्हा एकदा टोलविरोधी अस्त्र उगारले आहे. यामध्ये त्यांनी अजित पवारांचे टोलमुक्तीचे भाषण, मनसेने आंदोलन उभारल्यानंतर उद्धव ठाकरेंची घोषणा आणि भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे टोल माफी देण्याचे भाषण पत्रकार परिषदेत दाखविले. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे ही दोन व्हिडीओ दाखविण्यात आले.
यामध्ये फडणवीस यांनी राज्यात टोलमाफी देण्यात आली असून फक्त मोठ्या कमर्शिअल गाड्यांनाच टोल आकारला जात आहे, असे सांगितले होते. हे खरे आहे का? तुम्हाला कार घेऊन जात असताना टोल भरावा लागत नाहीय का? फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे कार, रिक्षा, टुव्हीलरना टोल माफी असेल तर मनसेचे सैनिक प्रत्येक टोलवर उभे राहून हा टोल आकारू देणार नाहीत. जर नाही झाले तर आम्ही सर्व टोलनाके जाळून टाकू, असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दोन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. तुम्ही माघार का घेतली? आताच्या सरकारवर दबाव आहे का? कोणाच्या उत्पन्नाचे साधन आहे का? याची उत्तरे मला पुढील दोन-तीन दिवसांत मिळतील. हे पैसे राज्य सरकारने घेतलेत का? जर घेतले असतील तर लोकांना चांगले रस्ते का मिळत नाहीत, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….