मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हसत-हसत बोलत होते; राहुल गांधींनी पुन्हा साधला मोदींवर निशाणा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर दिलेल्या उत्तरावर निशाणा साधला.
राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर गेल्या अनेक महिन्यांपासून जळतंय. मी जवळपास 19 वर्षे राजकारणात आहे. कधी वादळ आलं, कधी त्सुनामी आली, प्रत्येक राज्यात गेलो. पण मणिपूरमध्ये जे पाहिलं ते यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. तसेच, मोदी मात्र त्यांच्या भाषणात दोन तास चेष्ठा करत होते. ते हसत-हसत बोलत होते, असं म्हणत राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी बोलताना म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संसदेत 2 तास 13 मिनिटं भाषण केलं. त्यापैकी शेवटच्या 2 मिनिटांत ते मणिपूरबद्दल बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. लोक मारले जात आहेत. महिलांवर बलात्कार होत आहेत, मुलांना मारलं जात आहे. तर मोदी काल हसत बोलत होते, चेष्टा करत होते, हे त्यांना शोभा देत नाही. भारताचे पंतप्रधान आहेत, जर देशात हिंसा होत असेल तर पंतप्रधानांनी दोन तास थट्टा करु नये. विषय काँग्रेस नव्हता, राहुल गांधी नव्हता तर मणिपूर होता. मणिपूरमध्ये काय होतंय आणि ते रोखलं का जात नाही? हा मुद्दा होता.”

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….