अनेक जण आमच्या संपर्कात, पण आमच्याकडे आता जागा नाही. भाजप नेत्याने स्पष्टच सांगितलं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे असे कधीही ठरले नव्हते. शिवसेना भाजप युतीच्या एवढ्या जाहीर सभा झाल्या. त्या सर्व जाहीर सभेचे व्हिडिओ आहेत. विश्वगौरव नरेंद्र मोदीजी यांच्या सभेत त्यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असेच सांगितले.
मात्र, राष्ट्रवादीसोबत यांची बैठक झाली आणि शरद पवार यांनी त्यांना सांगितलं की भाजपच्या कमी जागा आहे तर तुम्ही मुख्यमंत्री पदाची मागणी करा आणि तेच त्यांनी केलं. त्याचा फायदा उद्धवजीनी घेतला. निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 120 च्या वर जागा येणार नाही हे लक्षात आलं. त्यानंतर त्यांच्या मनात बेइमानी सुरू झाली अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.