ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- जुन्या काळातील अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे नुकतेच राहत्या घरी (दक्षिण मुंबई) आजाराने निधन झाले आहे. त्या ८० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे.
त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची बातमी माध्यमांना दिली. गेली अनेक वर्षे त्या मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. आशा नाडकर्णी यांनी अभिनेत्रीच्या रुपात प्रथम काम केले, तेव्हा त्या फक्त १५ वर्षांच्या होत्या.
त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. १९५७ ते १९७३ ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले आहे. नवरंग, दिल और मोहब्बत, क्षण आला भाग्याचा, फरिश्ता, गुरु और चेला आदी आशाजींचे काही गाजलेले चित्रपट आहेत.