‘वर्क फ्रॉम होम’चा असाही फायदा
विदर्भ वतन / नागपूर : लंडनमध्ये १६६५ मध्ये प्लेगची साथ पसरली होती. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी आयझॅक न्यूटन ट्रिनिटी महाविद्यालयात शिकत होते. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीसारखीच अवस्था त्यावेळी निर्माण झाली होती. न्यूटन त्यावेळी विस वर्षांचे होते. प्लेगचा संसर्ग अतिशय वेगात होत असल्याने त्यावेळीही प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन केल होत. संसर्ग झालेल्या अनेकांना क्वॉरेंटाइन केल जात ंहोत.
महाविद्यालये बंद केल्याने न्यूटन वूलस्टोर्प मनोरमधल्या घरी परतल्यानंतरही त्यांच संशोधन सुरूच होत. वॉशिंग्टन पोस्ट दैनिकाने न्यूटन यांनी प्लेगच्या काळात केलेल्या संशोधनावर एक विशेष लेख प्रसिध्द केला. त्यात न्यूटन यांनी प्लेगच्या साथीच्या दिवसांतच गुरूत्वाकर्षण सिध्दांतावर काम केल्याचा उल्लेख आहे. घरी परतल्यानंतर एका उद्यानात निवांत बसले असताना ते गुरूत्वाकर्षण शक्तीवर विचार करत होते. साथीमुळे त्यावेळीही ‘वर्क फ्रॉम होम’ची पध्दत सुरू होती. महाविद्यालयातून घरी आले, तरी न्यूटन यांचे संशोधन मात्र सुरूच होते.