गोंदियात कोरोनाचे २ संशयित रूग्ण आढल्याने खळबळ, दोघांचे नमुने नागपुरला तपासणीसाठी पाठविले
- गोंदियात विदेशातून आलेल्या ३५ जणांची तपासणी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
राधाकिसन चुटे / जिल्हा प्रतिनिधी / गोंदिया
गोंदिया:- जगात कोरोना व्हायरसची दहशत असताना विदेशात राहत असलेल्या ३५ जण गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले. त्या ३५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या पैकी दोन संशयित रूग्ण आढल्याने त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नागपुरला येथे पाठविण्यात आले आहे. बाहेरील देशातून देशात येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी होत असली तरी त्यांची तपासणी जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणा करीत असून त्यांची खबरदारी म्हणून करित आहे. मात्र दोन संशयित रूग्ण आढळल्याने गोंदियात एकदा खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात विदेशातून परत आलेल्या ३५ पैकी पाच लोक कतार येथून परतले आहेत. अबुधाबीतून दोन, रशिया दोन, दुबाई दोन, अमेरिका तीन, श्रीलंकेतून १३ थायलंड वरुन दोन तर इजिप्त येथून आले होते. तेव्हा या ३५ नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत का ? याची तपासणी केली असता, या मध्ये दोघांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे दिसून आली आली. त्यांचे रक्ताचे नमुने नागपुरला येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. तर ३३ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली मात्र त्यांच्या मध्ये कोरोनाची लक्षणे न आढळ्यास त्यांना घरी पाठविण्यात आले असून, त्यांना १४ दिवस कोणाच्या हि संपर्कात न येण्याचा सल्ला देण्यात आले आहे.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….