विद्यार्थींची गावाकडे परत येण्याची वेळ
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील १७ मुले कर्नाकटातील गुलबर्गा येथे शिकायला होती़. या सर्व मुलांची तपासणी करण्यात आली आहे़. सर्व धोक्याबाहेर असून त्यांना चंद्रपुरात परत आणण्यात आले आहे़. सोबतच मोठ्या प्रमाणात चंद्रपूरची मुले शिक्षणासाठी पुण्यामध्ये आहे़. करोना विषाणू संसर्गामुळे सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे़. विद्यार्थी गावाकडे परतत आहे़. मात्र काही खाजगी बसेस या काळामध्ये प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे लक्षात आले़. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी या सर्व खासगी ट्रॅव्हल्सला निर्देश देत कोणीकडूनही वाढीव पैसे घेऊ नये असे आदेश सोमवारी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नाही. विदेशात जाऊन आलेल्या नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.