माजी मिस्टर इंडियाचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन ; वॉशरुममध्ये आढळला मृतदेह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- प्रेमराज अरोरा याचा मृतदेह गुरुवारी वॉशरुममध्ये आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. प्रेमराज अरोरा वर्कआऊट केल्यानंतर वॉशरुममध्ये गेला होता.. असं सांगण्यात येत आहे. वॉशरुममध्ये हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे प्रेमराज अरोरा याचं निधन झाल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रेमराज अरोरा यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..
प्रेमराज अरोरा याच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज अरोरा कोणत्याही प्रकारची नशा करत नव्हता. तो फक्त त्याचं डायट फॉलो करायचा. फिटनेसकडे त्याचं लक्ष होतं.. प्रेमराज अरोरा हा फिटनेस कोच आणि इंस्ट्रक्टर देखील होता.. अशात प्रेमराज अरोरा याच्या निधनामुळे सर्वांना धक्का बसला आहे..
प्रेमराज अरोरा त्याच्या बॉडी आणि लूकमुळे कायम चर्चेत असायचा.. २०१४ मध्ये त्याने मिस्टर इंडिया किताब आपल्या नावावर करत सर्वांचं लक्ष वेधलं.. प्रेमराज पत्नी आणि दोन मुलींना कायमसाठी मागे ठेवून गेला आहे.. वॉशरुममध्ये मिस्टर इंडिया प्रेमराज याचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे..
प्रेमराज अरोरा यांच्या निधनाने पुन्हा एकदा अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची घटना चर्चेत आली आहे. कारण राजू श्रीवास्तव हे देखील जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध झाले होते. रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवस कोमात राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.