डॉ. अभय बंग यांचा ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ने सन्मान
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
गडचिरोली – अहमदनगर जिह्यातील लोणी येथील प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापिठाव्दारे डॉ. अभय बंग यांना डॉक्टर ऑफ सायन्स सन्मान देऊन गौरविण्यात आले़ कुलपती डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली़.
प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापिठाचा १४ वा पदवीदान समारंभ नुकताच झाला़ या सोहळ्यात प्रभारी कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. वाय एम़ जयराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते़. मान्यवरांच्या हस्ते पदवीदान समारंभात ३६३ पदवी, १२० पदव्युत्तर आणि नऊ पीएच़. डी अशा ४९२ विद्याथर्यांना पदवी देऊन आले़.
‘आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील, यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डाँ़ अभय आणि डॉ. राणी बंग गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’ या आरोग्यसेवी संशोधन संस्थेव्दारे ३२ वर्षापासून करीत आहेत़ त्यांच्या कार्याची प्रेरणा वैद्यकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी,’ असे आवाहन डॉ. केळकर यांनी केले़.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….