जावईबापू मुख्यमंत्री होऊदे रे बाबा…! पवारांसाठी सासुरवाडीने घातलं साकडं…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद ही चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. ‘सकाळ’च्या मुलाखतीत जेव्हा पवारांना विचारलं तेव्हाही त्यांनी आपल्याला आत्ता मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा बोलून दाखवली होती.
पण आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडंही घालण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा आहेत. अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, इथपर्यंत या चर्चा गेल्या होत्या. मात्र त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला. या चर्चांनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
आता त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तेरई गावच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडं घातलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ ने दिलं आहे. तेरईच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांची विधीवत पूजा केली आहे.