जळगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, शिंदे गट आणि गुलाबराव पाटील निशाण्यावर…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जळगाव :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांची आज जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेपूर्वी जळगामधलं राजकीय वातावरण तापलं आहे.
शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी या सभेला विरोध केला आहे. तसेच गुलाबराव म्हणाले की, आम्ही दगड मारून सभा, आंदोलनं उधळून लावणारे लोक आहोत. त्यामुळे पाचोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलीस बंदोबस्तात ही सभा पार पाडली जाईल.