चंद्रपूरात मनसेचा रस्त्यावर मोर्चा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, चंद्रपूर
चंद्रपूर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर शहराच्यावतीने शुक्रवारी जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात शहराध्यक्ष मनदीप रोडे यांच्यासह शेकडो युवक, महिला, नागरिक सहभागी झाले होते़
भूमिपुत्रांना उद्योग़, कंपन्यांमध्ये त्वरित रोजगार देण्यात यावा, अमृत वाहतूक कोंडी तसेच प्रदूषण करणाºया जडवाहतुकीवर कारवाई, चंद्रपूर शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांना घेऊन सदर मोर्चा काढण्यात आला़ जनतेला भेडसावणा-या समस्या जिल्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करून सोडव्यावा, अशी मागणीही करण्यात आली़ येत्या काळात मनसे स्टाइलने उग्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला़ मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना
विविध प्रश्नांचे निवेदन दिले़ मोर्चात रुग्णवाहिका चालकही गाडी घेऊन सहभागी झाले होते़