अतिक अहमदच्या हत्येच्या निषेधाचे महाराष्ट्रात झळकले बॅनर, केला ‘शहीद’ असा उल्लेख.…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज येथे गोळी घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (15 एप्रिल) रोजी समोर आली होती. या घटनेचं काही लोक समर्थन करत आहेत तर काही लोक प्रखर विरोध करत आहेत.
दरम्यान महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटत असून, बीडच्या माजलगावमध्ये अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले होते. तसेच बॅनरवर या दोघांचा शहीद उल्लेख करण्यात आला होता.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमदच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर दोघांच्या हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या बद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच हे बॅनर तात्काळ हटवण्यात आले आहे. मोहसीन भैय्या मित्र मंडळाकडून हा बॅनर लावण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान या बॅनरबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेचच हे तिथून हटवले. पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, मोहसीन भैय्या मित्र मंडळाने हे बॅनर लावले होते. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच या मोहसीन पटेलचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी हे बॅनर बनवणाऱ्या लोकांनाही ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना अटक होऊ शकते.
गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची प्रयागराज या ठिकाणी गोळी घालून हत्या करण्यात आल्याने सद्या उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.