१०वी च्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव, कारने उडवले
- यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू तर अन्य दोघी गंभीर जखमी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, गोंदिया
गोंदिया: दहावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तीन विद्यार्थिनींना भरधाव कारने उडवले. यात एका विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ आज हा अपघात झाला.
दहावीची आजपासून परीक्षा सुरू झाली आहे. तीन विद्यार्थिनी परीक्षेसाठी केंद्रावर जात होत्या. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाघाट मार्गावरील सावरी गावाजवळ सकाळी दहाच्या सुमारास एका भरधाव कारनं या तीन विद्यार्थिनींना उडवले. यात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघी जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. तसंच संतप्त जमावानं काही वेळ रास्ता रोको केला. कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.