संजय राऊतांचा खुलासा समाधानकारक नाही, हक्कभंगाचा झाला इथंपर्यंत पोहचलो – नार्वेकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात गेला आहे.
विधानसभेकडून हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत (rajya sabha) जाणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. आजच हक्कभंग प्रकरण विधानसभेकडून राज्यसभेकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळं आता राज्यसभेच्या अभिप्रायाकडं संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
हक्कभंगाच्या आरोपावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या खुलास्यावर विचार केला. तो मला समाधानकारक वाटत नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नार्वेकर यांनी सभागृहात ही माहिती दिली. त्याशिवाय संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग संदर्भातील प्रकरण उप राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग संदर्भात 20 मार्च पर्यंत मुदत वाढवून दिली होती. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे. त्यांनी केलेल्या खुलास्यावर मी विचार केला. पण समाधानकारक वाटला नाही. हक्कभंग झाला या निर्णयापर्यंत मी आलो आहे, असे नार्वेकर म्हणाले.
संजय राऊत हक्कभंग प्रकरणासाठी जी समिती गठीत केली आहे त्या समितीवर त्यांनी संशय व्यक्त केला आहेय. त्यांचा खुलासा मला समाधान कारक वाटत नाही. संजय राऊत यांचा हक्कभंग राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती यांच्याकडे पाठवत आहे, असे नार्वेकर म्हणाले. दरम्यान, विधान भवनाच्या पाय-यावंर काही घोषणा करतात. त्याचे पडसाद सभागृहात उमटत असतात. माध्यमातून प्रदर्शित केले जातात. सदस्यांच्या वर्तनाबाबात एसोपी १५ दिवसात केली जाईल. याचं उल्लंघन झाल्यास करावयाची तरतुद असेल, असेही नार्वेकर यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
कोल्हापूर दौऱ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना विधीमंडळाचा ‘चोर’मंडळ असा उल्लेख केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला होता. यानंतर संजय राऊता यांच्याविरोधात सत्ताधारी शिवसेना गट आणि भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसेच, राऊतांविरोधात हक्कभंग आणण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता. त्यासाठी समिती स्थापन करून संजय राऊत यांना नोटिसही बजावण्यात आली होती. या नोटिशीला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही. तरीरी माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्यास हरकत नाही. पण माझे विधान नेमके काय होते ते पाहा, असंही राऊतांनी म्हटलं होतं. दरम्यान, संजय राऊतांनी असं वक्तव्य केल्यानंतर सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेत टीका केली होती. तसेच भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याची मागणी देखील केली होती.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….