PM मोदींवरील टीकेवरुन CM शिंदे संतापले….! विधानसभेत विरोधकांना विचारला सवाल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन राहुल गांधी यांना नुकतीच कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली असून याचे पडसाद विधानसभेतही पहायला मिळाले.
पण त्याला उत्तर म्हणून भाजप-शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन विरोधकांवर संतापले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलण्यासाठी आपल्या जागेवरुन उठले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार गोंधळ घातला. या गोंधळात मुख्यमंत्री विरोधकांवर चांगलेच भडकलेले पहायला मिळाले. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर अंत्यविधी झाल्यानंतर ते कर्तव्यावर गेले तेव्हा त्यांना तु्म्ही चोर म्हणून हिणवलं. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसानसात भरलेलली आहे, त्यांचा तुम्ही आपमान करता, नाना हे बिल्कुल चालणार नाही. जे चुकीचं आहे त्या चुकीबद्दल मी हे वक्तव्य केलं आहे.
तुम्ही आता आमच्यावर कारवाईची मागणी करत आहात. आठ महिने आमच्या लोकांचाही तुम्ही अपमान केला आहे., त्यामुळं जर कारवाई व्हायची असेल तर ती सर्वांवर समान झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….