कुस्तीचा सराव करत होता, अचानक ह्रदयविकाराचा झटका आला ; महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेने लाल मातीतच सोडला प्राण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- लाल मातीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. लाल मातीच्या आखाड्यातच कुस्ती पैलवानाने अखेरचा श्वास घेतला.
स्वप्नील ज्ञानेश्वर पाडाळे (Swapnil Padale) असं या पैलवानाचं नाव आहे. ही दुर्दैवी घटना पुण्यातील मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पैलवानाच्या (Pune News) अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल पाडाळे हा महाराष्ट्र चॅम्पियन होता. बुधवारी सकाळी मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत ही दुर्दैवी घटना घडली. स्वप्निलच्या आकस्मिक जाण्याने त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. सध्या तरुणांचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शारीरिक आणि मानसिक तणावामुळे हृदयविकाराच्या झटका येऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तरीही तरुणांनी स्वत:च्या जीवनशैलीकडे लक्ष द्यायला हवं आणि जीवनशैलीत सुधारणा करायला हवी, असा सल्ला हॉक्टर देतात.
नेमकं काय घडलं?
मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान स्वप्निल पाडाळे नेहमीप्रमाणे मारुंजी येथील कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करत होता. पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे तो देखील व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो खाली पडला. स्वप्निल अचानक खाली पडल्याचे पाहून तालमीतील इतरांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या मृत्यूमुळे तालमीत गोंधळ निर्माण झाला होता. तरुण मुलगा गेल्याने पाडाळे कुटुंबियांवर दुख:चा डोंगर पसरला आहे.
तरुणांनी हृदय जपलं पाहिजे…
खरे तर सध्या धावत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होऊ शकतो. अलीकडे तरुणांना हृदयविकाराचा धोका वाढता असल्याचं निष्पन्न झालं आहे. विशीमध्ये आणि तिशीमध्येही तरुणांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी त्यांची चुकीच्या पद्धतीची जीवनशैली कारणीभूत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, धूम्रपानामुळे तरुणांमध्ये हृदयविकार वाढत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….