भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला मुंबई किनाऱ्याजवळ अपघात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भारतीय नौदलाच्या एका अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरला मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला आहे. ही घटना मुंबईतील किनाऱ्याजवळ घडली आहे.
या घटनेनंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य करण्यात आले. नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
भारतीय नौदलाच्या स्वदेशी ध्रुव अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने (ALH) बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग केले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे हेलिकॉप्टर मुंबईपासून नियमित उड्डाणावर होते, तेव्हा ते किनार्याजवळ अचानक खाली आले. त्यामुळे तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आले. ध्रुव हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू मेंबर्सना नौदलाच्या गस्ती पथकाने वाचवले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Indian Navy Helicopter)
ALH ध्रुव हे ५.५ टन वजनाच्या श्रेणीतील ट्विन इंजिन, मल्टी-रोल, मल्टी-मिशन न्यू जनरेशन हेलिकॉप्टर आहे आणि ते सेंटर फॉर मिलिटरी एअरवॉर्थिनेस सर्टिफिकेशनने (CEMILAC) लष्करी ऑपरेशन्ससाठी ‘type-Certified ‘ केले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….