नामांतरावरुन एमआयएमचं उपोषण तर मनसेकडून ‘स्वाक्षरी मोहीम’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकारण तापले आहे
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
तर आजपासून (4 मार्च) जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
तर हे बेमुदत संप कधीपर्यंत सुरु राहिल हे सांगता येणार नसल्याचं देखील जलील यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे.
यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
जलील यांनी शुक्रवारी उपोषणस्थळाची पाहणी करत आढावा घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी जलील यांच्याची चर्चा करत उपोषणाबाबत आढावा घेतला आहे.
सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी जलील यांच्यासोबत चर्चा करत उपोषण कसे असणार, किती लोक येण्याची शक्यता आहे, याबाबत माहिती जाणून घेतली आहे.
तर मनसेकडून नामांतराच्या समर्थनात आज स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….