मनीष सिसोदिया यांना ५ दिवसांची CBI कोठडी…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्ली उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सिटी कोर्टात हजर केले होते. सीबीआयने मनीष सिसोदिया यांची पाच दिवसांची कोठडी न्यायालयात मागितली होती.
दरम्यान न्यायालयाने सिसोदिया यांना पाच दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे.
मनीष सिसोदिया यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. यादरम्यान सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या कोठडीची मागणी केली होती. दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा युक्तिवाद सीबीआयने केला.
दरम्यान मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्लीतील मद्य धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना सीबीआयने रविवारी अटक केली होती.
दिल्लीमध्ये उत्पादन शुल्क धोरण जाहीर होण्याअगोदरच काही दारु उत्पादकांसाठी नियमावली ‘लीक’ करुन देण्यात आली, असा आरोप सिसोदिया यांच्यावर आहे. या प्रकरणी दारु उत्पादकांकडून शंभर कोटी रुपयांची लाच घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….