“आता ती वेळ निघून गेली..!” उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ ऑफरनंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं उत्तर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्रात २१ जून २०२२ ही तारीख कुणालाही विसरता येणार नाही. कारण याच दिवशी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बाहेर पडले. आधी ते सुरतला गेले त्यानंतर गुवाहाटीला. एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे बंड सर्वात मोठं ठरलं आहे.
अशात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्याला एक ऑफर दिली होती. त्या ऑफरला आपण नकार दिला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?
“एकनाथ शिंदे हे जेव्हा सुरतला निघाले होते त्यावेळी मला उद्धव ठाकरेंनी संपर्क केला होता. त्यानंतरही केला होता. मला तर त्यांनी इथपर्यंत सांगितलं की जे काही झालं ते झालं आता हे सगळं थांबवा आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा.मी त्यावेळी त्यांना उत्तर दिलं की आता ती वेळ निघून गेली. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्यांना आम्ही तोंडघशी पाडणार नाही. हे माझ्या आणि माझ्या पक्षाच्या धोरणात बसत नाही. “
उद्धव ठाकरेंसोबत जाऊ ही वेळ आता निघून गेली
आता उद्धव ठाकरेंशी हात मिळवणीची वेळ निघून गेली. मी बदला वगैरे म्हटलं होतं. संजय राऊत म्हणाले की आता एक व्हायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पुढे यावं पण आता ते शक्यच नाही. मात्र एक सांगतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माझे शत्रू नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. आम्ही सोबत चहा सोबत पिऊ शकतो. पण आता त्यांच्यसोबत जाऊ ही वेळच आता निघून गेली आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. झी चोवीस तासला दिलेल्या ब्लॅक अँड व्हाईट या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात होते तेव्हा त्यांना अडवणारे पहिले एकनाथ शिंदे होते
उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात होते तेव्हा त्यांना अडवणारे एकनाथ शिंदे होते. मला तेव्हा एकनाथ शिंदेंनी अस्वस्थ होऊन फोन केला होता की तुम्ही एकदा मातोश्रीवर येऊन जा सगळा विषय संपेल. मात्र एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून अस्वस्थ झाले होते. तीन पक्षाचं सरकार चालवणं कठीण होतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….