मोठी बातमी…! वंचितनंतर ठाकरेंना मिळणार आणखी एक पार्टनर…? अरविंद केजरीवाल मातोश्रीवर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात राजकारणात दररोज अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
शिवसेनेत बंड झाल्यानंतर मागच्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केले. त्यानंतर एकनाथ शिंदे पक्षावरही दावा ठोकला.
यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णय दिला. यात शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरेंनी गमावलं आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान देत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली.
सुप्रीम कोर्टाने मात्र याचिका दाखल करून घेतली असली तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. यातच आता राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्री येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….