माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.
शेखावत राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. देवीसिंह शेखावत हे अमरावती शहराचे पहिले महापौर होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.
सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली.
अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र, 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….