ठाकरे-फडणवीस राजकीय संघर्ष संपणार…? नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेला उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय बंडानंतर राज्यात सत्तासंघर्ष पेटला आहे. या सत्तासंघर्षात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा हातभार मोठा आहे.
शिवसेनेतील फुटीमागे भाजपचं पाठबळ असल्याचे बोलले जाते.
यादरम्यान शिंदे-ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष देखील पाहायला मिळाल. दरम्यान आता ठाकरे-फडणवीस यांच्यातील राजकीय संघर्ष संपणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळातून केला जातो आहे.
युवासेनेते नेते आदित्य ठाकरे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस याच्या विधानांनुळे राजकीय वर्तुळात याबद्दलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. त्यांच्याशी आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
यानंतर भाजपचे नेते फडणवीस यांनी देखील याबद्दल सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे शत्रुत्वाची भावना निर्माण झाली असून ती संपवण्याची गरजही असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या विधानाला दुजोरा देत फडणवीसांनी देखील हात पुढे केला आहे. ते म्हणाले की, मी देखील वारंवार सांगितलं आहे की आम्ही वैचारिक विरोधक आहोत. शत्रू बिलकूल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे ज्यामध्ये आपण वैचारिक विरोधक असतो. अलिकडच्या काळात शत्रूत्व दिसतंय. जे संपवण्याची गरज आहे.
मला जेव्हा जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं की उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालो कारण त्यांनी दुसरा विचार पकडला मी दुसापा विचार केला. यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….