काँग्रेसमध्ये मोठा बदल ; कॉंग्रेस वर्किंग कमिटीबद्दल घेतला मोठा निर्णय…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- कॉंग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे महाअधिवेशन रायपुरमध्ये पार पडत आहे. तीन दिवसीय अधिवेशनात राजकीय, आर्थिक, रोजगार, कृषि, आंतरराष्ट्रीय विषयांवर मंथन होणार आहे.
मात्र, याच दरम्यान काँग्रेस वर्किंग कमिटीबाबत मोठी निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीनंतर वर्किंग कमिटीच्याही निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे महाअधिवेशनात कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्याबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान, सुरु झालेल्या ८५ व्या अधिवेशनात इतर पदांच्या निवडणुका होणार की अध्यक्ष निवडणार याबाबत संभ्रम होता. त्याबाबत महाअधिवेशन शिबिरात त्यावर चर्चा झाली. त्यामध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडी हे अध्यक्ष करणार असा निर्णय घेण्यात आला.
काँग्रेस वर्किंग कमिटीसाठी निवडणूक होणार नसल्याचे समोर आले आहे. वर्किंग कमिटीच्या नियुक्तींबाबत अध्यक्षांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. रायपूर अधिवेशनात याबाबत सहमतीने निर्णय घेण्यात आला. अध्यक्षांना सर्व अधिकार देण्यात आल्याने वर्किंग कमिटीच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटी आपली वर्णी लागावी यासाठी कॉँग्रेस मधील अनेक नेत्यांनी आपली ताकद लावण्यास सुरुवात केली होती. निवडणुका झाल्यातर त्यामध्ये कोण बाजी मारणार यासाठी रणनीती ठरवली जात होती.
अशावेळी अधिवेशनात वर्किंग कमिटीचा निर्णय झाल्याने आता अध्यक्ष कोणाच्या खांद्यावर वर्किंग कमिटीची जबाबदारी टाकतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत कलाहात कोणाची वर्णी लागते याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….