‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तुकाराम सुपेंचे ६५ लाखांचे दागिने परत करण्याचा आदेश…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिने सुपे कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.जे. डोलारे यांनी शुक्रवारी दिले.
टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पुणे पाेलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तुकाराम सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचा प्रकार उडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली होती. या प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. सुपे यांचा जावई, मुलगा आणि नातेवाईकांची पोलिसांनी चौकशी केली होती. सुपे यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुपे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दोन कोटी ६४ लाखांची रोकड आणि ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. सुपे यांच्या पत्नीने बँकेत ठेवलेल्या मुदतठेवीच्या पावत्या तसेच जमीन खरेदी प्रकरणातील कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
या प्रकरणात सुपे यांच्यासह तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह १५ आरोपींच्या विरुद्ध तीन हजार ९९५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सुपे कुटुंबीयांच्या घरातून १९ डिसेंबर २०२१ रोजी ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. सुपे कुटुंबीयांचे दागिने परत करण्यात यावेत, असा अर्ज त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. अक्षय शिंदे यांनी न्यायालयात सादर केला होता.
सुपे कुटुंबीयांच्या घरातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांच्या मालकीचे तसेच वापरातील आहेत. जप्त करण्यात आलेले दागिने सुपे यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई यांचे आहेत. जप्त केलेले दागिने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. दागिने पोलीस ठाण्यात पडून राहिले तर नुकसान होईल. खटल्याच्या निकाल लागेपर्यंत जप्त दागिने आहे तसेच ठेऊ, अशी हमी बंधपत्राद्वारे (बांँड) न्यायालयात दिली जाईल. सुपे कुटुंबीयांचे दागिने परत करावेत, अशी विनंती सुपे यांचे वकील ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. अक्षय शिंदे यांनी युक्तीवादात केली. बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी सुपे कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आलेले दागिने परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….