आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार ; ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार…? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा बनत चालला आहे. कालपासून सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षावर पुन्हा एकदा सलग सुनावणी सुरू झाली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे.
यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी केली. पण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार का? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. या सुनावणीनंतर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत, असं म्हणता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती आणणं, ही तातडीची गरज आहे, असं सर्वोच्च न्यायालयाला वाटलं नसावं, त्यामुळे त्यांनी स्थगिती देण्यास नकार दिला असेल, अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.
आजच्या सुनावणीवर भाष्य करताना उज्ज्वल निकम म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही, त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत, असं म्हणता येणार नाही. कारण नैसर्गिक न्यायदान तत्त्वानुसार, न्यायालयाला दुसऱ्या बाजुचंही ऐकावं लागतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, आम्ही शिंदे गटालाही ऐकू आणि निवडणूक आयोगालाही ऐकू. यासाठी न्यायालयाने दोघांनाही नोटीस पाठवली आहे. आता या प्रकरणावर आठ दिवसांनी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोन्ही बाजुंचं ऐकलं जाईल. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.”
“त्याचबरोबर आम्ही निवडणूक आयोगाच्या निकालाचा फायदा घेणार नाही. म्हणजेच आम्ही आमच्या पक्षाचा नवीन व्हीप काढणार नाही. तो व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना बजावणार नाही, असं शिंदे गटाच्या वकिलांनी न्यायालयाला अभिवचन दिलं आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह दिलं असलं तरी याचा दुरुपयोग त्यांनी करू नये, याची खबरदारी सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. कोणताही व्हीप बजावणार नाही , असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालावर तातडीने स्थगिती आणणं, सर्वोच्च न्यायालया गरजेचं वाटलं नसावं,” अशी प्रतिक्रिया उज्ज्वल निकम यांनी दिली.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….