व्हीप कोण बजावणार..? ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार का..? राहुल नार्वेकरांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, “माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार.”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. याच निर्णयावर आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.
दरम्यान आजच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात तूर्तास नकार दिला आहे. तसेच शिंदे गटाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. ते आज (२२ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हे संसदीय लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे
“संविधानात व्हीप संदर्भात किंवा आमदारांच्या अपात्रते संदर्भातील तरतुदी अत्यंत स्पष्ट आहेत. १० व्या अनुसूचिमध्ये दिलेल्या तरतुदींनुसार विधिमंडळ गटातील निर्णय आणि विधिमंडळ गटातील सदस्यांनी कशाप्रकारे मतदान करावे हे व्हीपद्वारे सांगितले जाते. जर विधिमंडळ प्रतोदने मतदान करण्यासंदर्भात व्हीप दिला असेल, तर त्याची अंमलबजावणी होणे किंवा उल्लंघन होऊ नये हे संसदीय लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे,” असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आगामी अधिवेशनात शिंदे गटाची शिवसेना व्हीप जारी करून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी रणनीती आखू शकतो. शिंदे गटाने व्हीप जारी केला आणि त्याचे पालन न केल्यास ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात. यावरच कोण व्हीप जारी करू शकतो, तसेच विधानसभा अध्यक्षांकडे शिवसेना पक्षाबाबतच्या नोंदीवर राहुल नार्वेकर यांनी सविस्तर भाष्य केले आहे. “माझ्याकडे शिवसेनेशिवाय वेगळा गट असल्याचे कुठलेही निवेदन आलेलं नाही. माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार शिवसेना विधिमंडळ गट हा एकच आहे. त्यामुळे त्या एका गटाचा एकच विधिमंडळ गटनेता आहे आणि एकच मुख्य प्रतोद आहे. त्यामुळे नियमानुसार कार्यवाही होईल,” असे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
शिंदे गटाला नोटीस, दोन आठवड्यांतर पुन्हा सुनावणी
दरम्यान, ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्याधीशांनी शिंदे गटाला शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. तर या दोन आठवड्यांत आमचा व्हीप जारी करण्याचा तसेच आमदारांना आपत्र ठरवण्याबाबतचा कोणताही विचार नाही, असे शिंदे गटाने सांगितले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….