शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार…? नबाम रेबिया प्रकरणात काय झालं होतं…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- आज सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी होतं आहे. यामध्ये शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षावर सुनावणी करताना कलम २१२ नुसार या प्रकरणाचा विचार करावा असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
तर शिंदे गटाने या प्रकरणावर नबाम रेबिया प्रकरणाप्रमाणे निकाल देण्यात यावा असं म्हटलं आहे. अशात आता हे नबाम रेबिया प्रकरण नक्की काय आहे हे समजून घेऊ.
काय आहे नबाब रेबिया प्रकरण?
साल २०१६ मध्ये नबाम तुकीचं सरकार अरूणाचलमध्ये सत्तेत आलं होतं. अवघ्या काही महिन्यानंतर २७ आमदारांनी बंड केलं. सर्व बंड करणारे आमदार दिल्लीला पोहोचले. नबाम तुकी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी आमदारांनी हे बंड केलं होतं.
विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया बंड करणाऱ्या आमदारांची सदस्यता रद्द करणार होते. मात्र त्या आधीच अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल जे पी राजखोआ यांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल जे पी राजखोआ यांनी नबाम रेबिया यांना हटवण्यासाठी १६ डिसेंबर २०१६ रोजी विधानसभेचं सत्र बोलावण्याचे आदेश दिले.
राज्यापालांच्या निर्णयाच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष नबाम रेबिया यांनी उच्च न्यायालयात अपील केलं. उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती शासन परत घेण्याचे आदेश दिले होते.
काय होता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीशिवाय राज्यपाल विधानसभा सत्र बोलावू शकत नाही. राज्यपाल जे पी राजखोआ यांचा निर्णय असंवैधानिक होता, असा निर्णय दिला होता. मात्र,सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नबाम तुकी यांची याचिका फेटाळली होती. यानंतर तुकी विधानसभेत सरकार स्थापन करू शकले नाही.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….