पुसद न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत संपन्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- मा.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये दि.११/०२/२०२३ रोजी राष्टीय लोक अदालत मा. श्री.व्िह.बी. कुळकर्णी, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा न्यायाधीश-१, पुसद यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पॅनल क्रं.१ वर मा..व्हि.बि.कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, पुसद, पॅनल क्रं.२ वर आर.आर.मावतवाल, दिवाणी न्यायाधिाश व.स्तर पुसद, पॅनल क्रं.३ वर मा. एन.जी.व्यास, सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर पुसद, पॅनल क्रं.४ वर मा. व्िह.एस.वाघमोडे ३ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद, पॅनल क्रं.५ वर श्री. जि.एस.वरपे ५ वे सह-दिवाणी न्यायाधीश क.स्तर पुसद, पॅनल क्र.०६ वर झेड.झेड.कादरी ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद हे पॅनल न्यायाधीश म्हणून हजर हाेते. त्याचप्रमाणे पॅनल क्र. १ वर पॅनल सदस्य म्हणून अॅड. महेश पाठक, पॅनल क्र. २ वर ममता सगणे, पॅनल क्र. ३ वर अॅड. सुशिला नरवाडे, पॅनल क्र. ४ वर अॅड. अल्पणा जैस्वाल. पॅनल क्र. ५ वर अॅड.स्वेता पांढरीपांडे, पॅनल क्र. ६ वर अॅड.छाया देशमुख हजर होते. तसेच एस.एन. नाईक सह. दिवाणी न्यायाधीश व. स्तर, पुसद, डि.जी.म्हस्के, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, पुसद, श्रीमती एस.जी. जाधव, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, व्िह.बी.चव्हाण, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, पुसद, व पुसद येथील संजय राठोड, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पुसद तथा सचिव, तालुका विधीसेवा समिती, पुसद हे आवर्जून सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये उपस्थित होते आणि जिल्हा न्यायालय-१, पुसद येथील अधिक्षक श्री.व्हि.आर.बंगाले, इतर विधीज्ञ व न्यायालयीन कर्मचारी हजर होते.
सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाऊन्स (१३८ एन.आय.अॅक्ट) प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण ६,४००/- ठेवण्यात आलेले असून त्यापैकी एकूण १,०८६/- प्रकरणे समझोताद्वारे निकाली काढण्यात आलेले असून अशी एकूण रक्कम रु. ३,१०,६६,३७३/- (तिन कोटी दहा लाख सहासष्ट हजार तिनशे त्रेहात्तर फक्त) इतकी रक्कम आपसी तडजाेडीतुन वसुल करण्यात आलेली आहे.
सदर लोकअदालतमध्ये विधी सेवा समिती, पुसद येथील श्री.आर.व्ही.पेटकर, कु.ए.डी.बेले, श्री.एस.जी.मदणे, श्री.डी.डी.टाले, श्री.पि.ए.कोयरे, श्री.निलेश एम. खसाळे, श्री जे.जे. जाधव व इतर ब-याच संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता परिश्रम घेतले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….